एक्स्प्लोर
India-China dispute : भारत-चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चेची आज 12वी बैठक
भारत-चीन यांच्यातील सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांतील लष्करी अधिकाऱ्यांची बैठक आज सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गोगरा, हॉट-स्प्रिंगसारख्या वादग्रस्त भागातून चीनचं सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा होणार आहे. गेल्या जानेवारी महिन्यात पहिल्या टप्प्यात सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण तरीही दोन्ही देशांत तणाव कायम होता. पण या महिन्यात भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत लष्करी अधिकाऱ्यांची बैठक घेण्याबाबत सहमती झाली होती. त्यादृष्टीनं आजची बैठक महत्वाची आहे.
आणखी पाहा























