CSDS Survey: राम मंदिर नव्हे;महागाई आणि बेरोजगारी मोठे मुद्दे;सीएसडीएसच्या सर्वेक्षणातून माहिती समोर
CSDS Survey: राम मंदिर नव्हे;महागाई आणि बेरोजगारी मोठे मुद्दे;सीएसडीएसच्या सर्वेक्षणातून माहिती समोर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हिंदुत्व, राम मंदिर आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बरीच चर्चा सुरू आहे. मात्र बहुतांश मतदारांसाठी महागाई आणि बेरोजगारी हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत. सीएसडीएस या नामांकित संस्थेच्या लोकसभा निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. १९ राज्यांमधील १० हजार मतदारांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता. ७ टक्के मतदारांना बेरोजगारी, २३ टक्के लोकांना महागाई तर, १३ टक्क्यांना विकास हे तीन मुद्दे महत्त्वाचे वाटतात. फक्त २ टक्के लोकांनी हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. अयोध्येमधील राम मंदिराचं उद्घाटन जानेवारी महिन्यात झालं. मात्र, रामाची लाटही ओसरू लागली असून हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत फारसा प्रभावी नसल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट होतंय.