AP Coronavirus Strain | स्पेशल रिपोर्ट | आंध्र प्रदेशात कोरोनाचा नवा स्ट्रेन, 15 पट धोकादायक
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशातील अनेक राज्यांत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अनेक राज्यांत उपचाराअभावी रुग्णांचे जीव जात आहे. अशातच एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. वैज्ञानिकांच्या हाती कोरोनाचा असा म्युटेंट लागला आहे, जो इतर स्ट्रेनपेक्षा 15 पट अधिक संसर्गजन्य आहे. या म्युटेंटमुळे देशातील काही भागात थैमान सुरु झाले असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
संशोधकांनी अशा कोरोना विषाणूचा शोध लावला आहे, जो संसर्ग पसरवणाऱ्या इतर सर्व स्ट्रेनपेक्षा सध्या 15 पट अधिक संसर्गजन्य आहे. या म्युटेंटचे नाव 'N440K' आहे. संशोधकांना असे दिसून आले की या म्युटेंटमुळे देशातील काही भागात दुसर्या लाटेचा वेग अनियंत्रित झाला आहे.



















