Ayodhya Ram Mandir : राममंदिरात दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त
Ayodhya Ram Mandir : राममंदिरात दर्शनासाठी भाविकांची तोबा गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त
Ram Mandir: अयोध्या : अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) हस्ते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यानंतर अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) आजपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. सकाळी आठ ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत रामाचं (Shree Ram) दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे अयोध्येतील (Ayodhya) रस्त्यांवर भक्तांचा महापूर पाहायला मिळतोय. आपल्या लाडक्या रामाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे. परंतु, काल अभिषेक सोहळा झाल्यानंतर गर्दीचं रुपांतर मंदिराच्या आवारात चेंगराचेंगरीत झाल्याचं पाहायला मिळालं. अभिषेक सोहळा झाल्यानंतर संध्याकाळी लोकांनी दर्शनासाठी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच, मंदिर परिसरात असणाऱ्या प्रसारमाध्यमांना कॅमेरे बंद करण्यासही सांगण्यात आलं.