Agra Expressway Accident : आग्रा एक्सप्रेसवेवर मृतदेहावरून रात्रभर गाड्या चालल्या
Agra Expressway Accident : आग्रा एक्सप्रेसवेवर मृतदेहावरून रात्रभर गाड्या चालल्या उत्तर प्रदेशातून एक अतिशय धक्कादायक बातमी आहे. आग्रा एक्सप्रेसवेवरील एका मृतदेहावरून रात्रभऱ गाड्या जात राहिल्या, ज्यामुळे त्या मृतदेहाचा अक्षरशः चुरा झाला. सकाळी या मृतदेहाचे अवशेष अक्षरशः फावड्यानं खरवडून काढावे लागले. हा मृतदेह एक्स्प्रेसवेवर कसा आला, ही व्यक्ती कोण होती, याबाबत अजून काहीच माहिती नाहीये. मृतदेहाचं केवळ एक बोट शिल्लक आहे, त्यावरून फिंगरप्रिंट घेऊन पोलीस या मृतदेहाची ओळख पटवणार आहेत. दाट धुकं असल्यामुळे वाहन चालकांना हा मृतदेह दिसला नसावा, ज्यामुळे रात्रभर त्याच्यावरून गाड्या ताशी १०० किमी वेगानं जात राहिल्या. जवळपास अर्धा किलोमीटरच्या पट्ट्यात या मृतदेहाचं अवशेष विखुरले होते.























