Delhi Wedding Crime: पळून जाऊन लग्नासाठी अघोरी कृत्य, मैत्रिणीची हत्या करुन चेहरा विद्रुप
पळून जाऊन लग्न करण्यासाठी एक प्रेमी युगुलाने जे केलंय, ते ऐकून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. फेसबुकवर झालेल्या ओळखीचं प्रेमात रुपातंर झालं आणि नंतर पळून जायचंही ठरलं. पण नंतर कुणीही शोध घेऊ नये म्हणून ओळखीच्याच एका महिलेची हत्या करून, तिला स्वत:चे कपडे घालून, उकळतं तेल चेहऱ्यावर टाकण्याचं अमानवी कृत्य या प्रेमी युगुलाने केलंय. ग्रेटर नोएडा येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. पायल आणि अजय ठाकूर असं त्या प्रेमी युगुलाचं नाव आहे. त्यांनी ओळखीतल्याच हेमा नावाच्या तरुणीची हत्या केलीय. विशेष म्हणजे, हेमाचा चेहरा ओळखू न आल्याने तिच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारही केले. पण पोलिसांना संशय आला आणि त्यांनी चौकशी केली. तेव्हा पायल आणि अजय ठाकूरने या गुन्ह्याची कबुली दिलीय.























