एक्स्प्लोर
Hingoli Rain : ईसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडले,मराठवाडा - विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प
मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे कारण ईसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने पाणी शिऊर पुलावरून वाहत आहे त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला आहे हिंगोली पुसद रोडवर असलेल्या या शिऊर पुलावरून जवळपास तीन ते चार फूट उंच इतके पाणी वाहत असल्याने या पाण्यातून प्रवास करू नये असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
सतत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे ईसापुर धरणात आवक वाढली आहे परिणामी विसर्ग सुरू केल्याने अशा पद्धतीने वाहतूक बंद झाली आहे परिणामी प्रवासी पर्यायी मार्ग शोधून प्रवास करताना सुध्धा दिसून येत आहेत
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















