Dr. Ravi Godse :रत्नागिरीत जन्म,मुंबईत शिक्षण,4 हॉलिवूड सिनेमांचं दिग्दर्शन,रवी गोडसेंची पर्सनल लाईफ
गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा विस्फोट झालाय.. ओमायक्रॉनचा फैलाव वाढल्यानं तिसरी लाट सुरू झाल्याचं चित्र आहे. रुग्णवाढ अशीच राहिली तर तिसऱ्या लाटेत जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात दोन लाख रुग्ण उपचाराधीन असतील, असा अंदाज आहे आणि तिसऱ्या लाटेत ८० लाख रुग्णांची नोंद झाली आणि एक टक्का मृत्यू गृहित धरला तरी ८० हजार मृत्यू होऊ शकतात असा अंदाज सरकारी यंत्रणेनंच वर्तवलाय. असं असलं तरी ओमायक्रॉनचा फारसा धोका नाही आणि भारतात तिसरी लाट येणारच नाही असा दावा डॉ. रवी गोडसे यांनी केला होता. कारोना काळात रवी गोडसे सरांचे व्हिडियोज सर्वाधिक पाहिले गेले. जेव्हा अख्खं जग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करतंय तेव्हा भारतातली स्थिती, आपण सर्वांनी घ्यायची काळजी यासोबतच लहान मुलांच्या लसीकरणाविषयी डॉ. रवी गोडसेंशी साधलेला संवाद























