Nagpur Family Suicide | नागपुरात डॉक्टर महिलेने दोन लहान मुलं आणि पतीसह जीवन संपवलं
नागपूर नजीकच्या कोराडी येथे एक धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. एका परिवारातील 4 व्यक्तींचे त्यांच्या राहत्या घरी मृतदेह सापडले आहे. पती, पत्नी आणि 2 चिमुकले असे मृतक असून ह्यातील पत्नीचा मृतदेह हा गळफास लावलेल्या स्तिथीत सापडला आहे. मृतक सुषमा राणे ह्या बीएएमएस असून धंतोलीतील एका हॉस्पिटल मध्ये कार्यरत होत्या. त्यांचे पती धीरज राणे हे रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मध्ये प्रोफेसर होते. हे दोघे ही उच्चशिक्षित पती पत्नी आपल्या 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 6 वर्षीय मुलगी वन्याबरोबर आज मृत अवस्थेत सापडले. नवरा आणि दोन्ही मुलं मृत अवस्थेत पलंगावर झोपलेले, तर पत्नी दुसऱ्या खोलीत गळफास लावलेल्या स्तिथीत.


















