एक्स्प्लोर
Dhule Winter : धुळेकर कुडकुडले, नाशिक आणि साताऱ्यासह धुळ्यातही तापमान घसरलं
एकीकडे राज्यात सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे मात्र राज्यात वाढलेल्या थंडीने नागरिकांमध्ये चांगलीच हुडहुडी भरली आहे या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत असून धुळे शहराच्या विविध भागात नागरिकांची व्यायामासाठी गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे आठ अंश सेल्सिअस वर धुळे शहरासह जिल्ह्याचे तापमान येऊन पोहोचलेले असताना या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत, वाढत्या थंडीचा फायदा रब्बी हंगामाच्या पिकांना देखील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे, धुळे शहरातील नागरिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दीक्षित यांनी....
आणखी पाहा


















