एक्स्प्लोर
Dharashiv Rain : पावसाची दडी, बळीराजा चिंतेत; मिरची वाचवण्यासाठी बाटलीनं पाणी देण्याची वेळ
सध्या राज्यातल्या काही भागांमध्ये ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या झळ्या बसू लागल्यात. तर तिकडे धाराशिव जिल्ह्यात पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय. पिकं वाचवण्यासाठी बळीराजा प्रयत्न करतोय. धाराशिवमधील बावी येथील राठोड कुटुंबीय आपल्या शेतातील लावलेली मिरची वाचवण्यासाठी वाट्टेल ते करतायत.. पाण्याच्या बाटल्या भरून आणून बाटलीने पाणी घालून मिरचीचं पिक वाचवण्याचा प्रयत्न करतायत. .या बाटलीच्या पाण्याने मिरचीला थोडं का होईना जीवनदान मिळेल खरं पण पावसाने अशीच पाठ फिरवल्यानं, शेतकऱ्याचं जगणं मात्र अवघड होणार असल्याचे चित्रं सध्या दिसत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















