Chhatrapati Sambhaji Nagar : औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नावं आता छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhaji Nagar : औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नावं आता छत्रपती संभाजीनगर
औरंगाबाद शहरानंतर जिल्ह्याचंही नावं आता बदलण्यात आलाय. यापुढे औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलंय. राज्य सरकारने काल रात्री याचं नोटिफिकेशन काढलंय. यात उस्मानाबाद जिल्ह्याचही नाव बदलण्यात आलंय. उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव आता धारशिव करण्यात आलंय. नामांतरबाबत मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आलेल्या आक्षेपांची पडताळणी झालेली नसल्याने तूर्तास औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं सरकारनं ठरवलं होतं. परंतु काल रात्री सरकारने नोटिफिकेशन काढून दोन्ही जिल्ह्याचे नाव बदललं.























