Paromita Goswami Bank Controversy : पारोमिता गोस्वामींच्या बचत बँकेला अनधिकृत घोषित करण्यावरून वाद
सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी (Paromita Goswami) यांच्या संपदा अर्बन निधी लिमिटेड या बचत बँकेला अनधिकृत घोषित करण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. चंद्रपूरच्या (Chandrapur News) आर्थिक गुन्हे शाखेने एक पत्र काढून गोस्वामी यांच्या बचत बँकेसह आणखी दोन बँकांना अनधिकृत घोषित केले आहे. केंद्रीय कार्पोरेट मंत्रालयाने विशिष्ट एनडीएच 4 प्रमाणपत्र नसण्यावरुन ही बँक अनधिकृत असल्याची घोषणा केली आहे. या बँकेत यापुढे कुणीही सदस्यत्व घेऊ नये असे EOW ने म्हटलं आहे. तर दुसरीकडे आपल्या एनडीएच 4 प्रमाणपत्राची प्रक्रिया प्रलंबित असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र मिळणार असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने केलेली घोषणा अन्यायकारक असल्याचं मत गोस्वामींचं आहे. त्यामुळे एनडीएच 4 च्या प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन गोस्वामी आणि चंद्रपूर पोलीस समोरासमोर उभे ठाकले आहेत.