Sangali Update : सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये आज बंदची हाक ABP Majha
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये आज बंदची हाक देण्यात आलीए. मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय. तर काल इस्लामपूर नगरपालिकेच्या सभेत दोन गटांच्या नगरसेवकांमध्ये तुफान राडा झाला. भुयारी गटार योजनेचं काम सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन हा राडा झाल्याचं कळतंय. मुख्याधिकारी कामं सुरु करत नसल्याचा आरोप करत विकास आघाडी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सभागृहातच सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये हमरातुमरी झाली. यावेळी विकास आघाडीच्या नगरसेवकांनी तर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली असता तिथेही वादावादी झाल्याचं दिसलं. त्यानंतर पोलिसांनी विकास आघाडी आणि शिवसेनेच्या ६ नगरसेवकांना ताब्यात घेतलं. त्यावरुन विकास आघाडी, शिवसेना, मनसेकडून आज इस्लामपूर बंदची हाक देण्यात आलीय.