Shegaon : रस्त्याचा मंगळ, रखडला 40 ते 50 तरुणांचा शुभमंगल; काय आहे प्रकरण?
आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे मुलांची लग्न रखडलेली आपण पाहिली असतील. मात्र बुलढाण्यातल्या शेगावमध्ये रस्त्याअभावी मुलांची लग्न जमत नसल्याचं वास्तव समोर आलंय. शेगावपासून 7 किमी अंतरावर असलेल्या एकफळ या गावातील तरुणांना सध्या लग्नाची चिंता सतावेतय.. गावाला रस्ताच नसल्यामुळे या गावात लग्नासाठी कुणी मुलगी देण्याचं धाडस करत नाही... यामुळे या गावातील 40 ते 50 तरुण आजही अविवाहित आहेत. प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय.. तर रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत धरून रेल्वे रुळावरून प्रवास करावा लागतोय... अशा प्रसंगी एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय.























