एक्स्प्लोर
Advertisement
Bihar Election Dates Announced: बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर, तीन टप्प्यात निवडणुका
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेत बिहार विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. विधानसभेच्या 243 जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.
असे असणार बिहार विधानसभा निवडणुकीचे तीन टप्पे
पहिला टप्पा- 16 जिल्ह्यातील 71 जागा (28 ऑक्टोबर)
दुसरा टप्पा- 17 जिल्ह्यातील 94 जागा (3 नोव्हेंबर)
तिसरा टप्पा- 15 जिल्ह्यातील 78 जागा ( 7 नोव्हेंबर)
मतमोजणी आणि निकाल - 10 नोव्हेंबर
बिहार निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स
- एका मतदान केंद्रावर 1 हजार मतदारच करु शकणार मतदान
- निवडणुकीसाठी 7 लाख सॅनिटायझर देण्यात येणार आहेत तर 46 लाख मास्कची व्यवस्था केली आहे. तर 6 लाख पीपीई कीट, 6.5 लाख फेस शिल्डची व्यवस्था केली आहे.
- सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जे कोरोना रुग्ण आहेत ते शेवटच्या एका तासात मतदान करु शकतील.
- कोरोना रुग्ण ज्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे त्यांना शेवटच्या दिवशी संबंधित मतदान केंदावर जाऊन मतदान करता येणार आहे.
- आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली हे मतदान होईल. याशिवाय पोस्टल सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- एका मतदान केंद्रावर एक हजार मतदार मतदान करु शकतील.
- निवडणूक अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना केवळ दोन गाड्यांची परवानगी असणार आहे.
- अर्ज भरण्यासाठी दोनच व्यक्ती सोबत ठेवू शकणार. घरोघरी प्रचारादरम्यान पाच लोकांच्या वर लोकं असू नयेत
- प्रचारादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक
बातम्या
Donald Trump | ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special Report
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
Ajit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...
दुपारी २ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM-टॉप हेडलाईन्स 07 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement