एक्स्प्लोर
Vinayak Mete LAst Speech : विनायक मेटेंचं अखेरचं भाषण, अखंड हरिनाम साप्ताहला होते उपस्थित
Vinayak Mete Accident News : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
बीड तालुक्यात गोरक्षनाथ टेकडी इथं शुक्रवारी झालेला विनायक मेटे यांचा कार्यक्रम त्यांचा अखेरचा जाहीर कार्यक्रम ठरला. संत किसनबाबा यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्तानं आयोजित केलेल्या अखंड हरिनाम साप्ताहाची सांगता शुक्रवारी झाली. जिल्हाभरातून हजारो लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कीर्तनानंतर विनायक मेटे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. २५-३० हजार लोक बसू शकतील असा सभामंडप पुढच्या वर्षीपर्यंत बांधून देऊ असा शब्द त्यांनी यावेळी दिला. आपल्या छोट्याशा खुसखुशीत भाषणात त्यांनी उपस्थितांना खळखळून हसवलं. आणि पुढच्या काही तासांनी मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी आली.
बीड
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















