Row over renaming Aurangabad as Sambhajinagar | नामांतरावरुन सेना-मनसेत 'सामना'
औरंगाबाद : मसने कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर पत्रकं भिरकावल्याची घटना घडली आहे. औंरगाबाद शहराच्या नामांतरावरुन मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच औरंगाबादचं संभाजीनगर कधी करणार? असा संतप्त सवालही मनसे कार्यकर्त्यांनी चंद्रकांत खैरे यांना केला आहे.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी आज मनसेनं शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये मनसेकडून चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवण्यात आली. खैरे यांच्या अंगावर पत्रकं देखील भिरकावली. खरंतर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं, यासाठीचा वाद सुरु आहे. मनसेनं औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी 26 जानेवारीचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यानंतर मनसेकडून आता चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून आंदोलन करण्यात आलं. यावेळी खैरे यांनी मनसेची ही स्टंटबाजी असल्याचं म्हटलं तर मनसेनं देखील शिवसेनेला हे करून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे.