Imtiaz Jaleel Protest : लग्न मंडपातून नवरदेव थेट उपोषणस्थळी, उपोषणात जेवणाच्या पंगती उठल्याचा आरोप
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एमआयएमचं आदोलन सुरुच आहे... खासदार इम्तियाज जलील यांच्या साखळी उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे... आंदोलनात लग्न लागल्यानंतर नवरदेवाने थेट उपोषणाच्या ठिकाणी जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. लग्नाचे कपडे घालून आलेल्या या नवरदेवाला पाहून उपोषणस्थळी चर्चेचा विषय बनला होता. तर दुसरीकडे याच साखळी उपोषणात काल जेवणाच्या पंगती उठवचा आरोप होतोय... उपोषण स्थळी बिर्याणीची दावत देण्यात आल्याची माहिती मिळतेय... उपोषणस्थळी जेवणाच्या पंगती उठत असतील तर त्या उपोषणाला उपोषण म्हणायचं का? असा प्रश्न शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे .. शिवाय उपोषण स्थळी सीसीटीव्ही. बसवण्याची मागणी देखील जंजाळ यांनी केली..
महत्त्वाच्या बातम्या





















