Aurangabad : एक दोन घरं नाही, अख्खं गाव लुटण्याचा चोरट्यांचा प्लॅन! गावकरी उठले अन् प्लॅन चौपट
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बागायतदारांच आणि कापूस व्यापाऱ्यांचं अशी ओळख असलेल्या वडजी गावात शुक्रवारी मध्यरात्री काही चोरट्यांनी प्रवेश केला. अख्खं गाव लुटण्याचा प्लॅन करून आलेल्या या चोरट्यांनी संपूर्ण गावातील घरांच्या आधी कड्या लावून घेतल्या.
गावलुटीसाठी आलेल्या चोरट्यांनी सुरवातीला गावातील सखाराम दामोदर वाघमारे यांच्या घरात प्रवेश करत घरातील सोन्याची दागिने शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या हाती अंदाजे साडेसात लाख रुपयांच सोनं सुध्दा लागलं,पण गावातील लोकं जागी झाली, पण सर्वांच्या कड्या लागलेल्या असतांना कुणालाच बाहेर पडता येईन, पण गावातील लोकांच्या मोबाईलच्या टॉर्च सुरू झाल्याचं पाहता चोरट्यांनी पळ काढला आणि गाव लुटीचा प्लॅन फसला.























