एक्स्प्लोर
Fake Certificate : लस न घेता मिळालं लसीकरणाचं सर्टिफिकेट, खोटे सर्टिफिकेट बनवणारी टोळी गजाआड
एकीकडे लस न घेणाऱ्यांवर औरंगाबादमधील प्रशासनानं दंडाचा बडगा उगारला असताना दुसरीकडे लसीकरणाचं खोटं प्रमाणपत्र बनवून देणाऱ्यांनी डोकं वर काढलं होतं. मात्र पोलीसांनी या प्रकरणात एका डॉक्टरसह ५ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पल्स हॉस्पिटल, व्ही. आय.पी. फंक्शन हॉल जवळ, औरंगाबादमध्ये पैसे घेवून कोव्हीड-19 लसीकरण प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार छापा टाकत ही कारवाई करण्यात आलेय. या प्रकरणात डॉक्टर शेख मोईनुद्दीन शेख फहीम हा डॉक्टर, एक नर्स आणि अन्य तीन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
आणखी पाहा























