एक्स्प्लोर
Aurangabad | औरंगाबादमध्ये कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाची चाकूनं भोसकून हत्या
औरंगाबादच्या नगरखाना भागात कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापकाची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. प्रकाशभाई पटेल असं मृताचं नाव आहे. काल प्रकाशभाई पटेल हे त्यांच्या दुकानात बसले होते. त्यावेळी अचानक एक व्यक्ती बंदूक घेऊन दुकानात शिरला. त्याला पाहताच पटेल दुकानाबाहेर पळाले, मात्र बाहेर असलेल्या दुस-या हल्लेखोरानं पटेल यांच्या पोटात चाकू भोसकला. बंदूक घेवून आलेला मारेकरी याची दृष्य सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या घटनेत 3 मारेकरी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तोंडाला कपडा बांधून मारेकरी असल्यानं त्यांची ओळख पटली नाहीये.. कुरीअरच्या माध्यमातून या ठिकाणी हवालाचा व्यवहार चालत होता, त्यातूनच हा खून झाला असावा असा पोलिसांना संशय आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























