Aurangabad Vaccination : औरंगाबादमध्ये लसीकरणासाठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा
Aurangabad Vaccination : औरंगाबादमध्ये लसीकरणासाठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा
औरंगाबादमध्ये लसीकरणासाठी तोबा गर्दी झाली आहे. सिडको, एन आठ इथल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी उसळली आहे. आजच्या दिवशी केवळ दीडशे नागरिकांनाच लस देण्याचे नियोजन असताना पाचशेहून अधिक लोकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये लसीचा पुरवठा झालेला नव्हता. बुधवारी (5 मे) काही लसीचे डोस औरंगाबादमध्ये दाखल आहेत आणि आज शहरात लसीकरण सुरु झालं आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. अगदी सकाळी सहा वाजल्यापासून लोक रांगेत उभे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या























