एक्स्प्लोर
Aurangabad Metro : औरंगाबादवासियांचं स्वप्न होणार का साकार? शेंद्रा ते वाळुज मेट्रोसाठी हालचाली सुरु
औरंगाबादवासियांचं मेट्रोचं स्वप्न लवकरच साकार होण्याची शक्यता आहे. कारण मराठवाड्यातील पहिली मेट्रो औरंगाबादमध्ये धावणार आहे. शेंद्रा ते वाळुज मेट्रोसाठी हालचाली सुरु झाल्यात. वाळुज ते शेंद्रा आणि बिडकीन ते हर्सल या मुख्य मार्गावर मेट्रो सुरु करण्याचा विचार आहे. या मार्गावर मेट्रो आणि उड्डाणपूल बनवण्यासाठी रेल्वे कॉर्पोरेशन अर्थात मेट्रोच्या माध्यमातून प्राथमिक स्वरुपात काम सुरु झालंय. कोलकाता, दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे, नवी मुंबई या शहरानंतर लवकरच औरंगाबादमध्ये मेट्रो धावताना दिसणार आहे.
आणखी पाहा























