Akola Rains: अकोला जिल्ह्यात रात्री ढगफुटीसदृश पाऊस; जिल्हा प्रशासन बेसावध, नागरिकांची तारांबळ
अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल रात्री दीड वाजेपर्यंत ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये नागरि वस्तीत पाणी शिरलंय. अकोल्याच्या मोर्णा नदीला गेल्या १५ वर्षातला सर्वात मोठा पूर आलाय. एवढ्या मोठ्या पूरस्थितीसाठी जिल्हा प्रशासन तयार नव्हतं असंच चित्र दिसून येतंय. कारण नागरिकांप्रमाणे प्रसासनाचीही तारांबळ उडाल्याचं दिसून येतंय. इकडे अकोल्याच्या खेतानगर परिसरात असलेल्या ड्रीमलँड सीटीमध्ये पाणी साचलंय. त्यामुळे जवळपास ५० नागरिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकून आहेत. या भागात पाणी जास्त असल्यानं नागरिकांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्येही मोठया अडचणी येत आहेत.






















