Radhakrishna Vikhe Patil Speech : समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून विकासाचे नवे मार्ग खुले होणार
Radhakrishna Vikhe Patil : समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून विकासाचे नवे मार्ग खुले होणार
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झालाय. शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. या मार्गामुळे शिर्डी ते भरवीर अंतर 40 ते 45 मिनिटांत पार करता येणार आहे. याआधी नागपूर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आले होतं. त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होतं. आज याच दुसऱ्य़ा टप्प्याचं लोकार्पण पार पडलं. या मार्गामुळे नाशिक, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यातील गावांना फायदा होणार आहे. शिर्डी, अहमदनगर आणि सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगरात येण्यासाठी कमी कालावधी लागणार आहे.























