एक्स्प्लोर
Thorat-Tambe : बाळासाहेब थोरात - सत्यजीत तांबेंचा एकत्र प्रचार, थोरात - विखेंचं पॅनल आमने - सामने
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चाललीये.. या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमनेसामने आलेत.. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ अपक्ष आमदार सत्यजीत तांबे मैदानात उतरलेत.. यावेळी पदवीधर निवडणुकीत उघड मदत करणाऱ्या विखेंवर सत्यजीत तांबे यांनी नाव न घेता टीका केलीय.. पलीकडून एक विमान निघालेलं आहे.. त्याला ना पायलट ना त्यांच्यात इंधन अशी अवस्था आहे.. ते विमान कुठंतरी धडकल्याशिवाय राहणार नाही अशी टीका तांबेंनी केलीये..
आणखी पाहा























