SAVE OLD TREES! सयाजी शिंदेंच्या जुनी दुर्मिळ वाचवण्यासाठीच्या उपक्रमात आदित्य ठाकरेंचा पुढाकार
मुंबई : सांगली येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष वाचवण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमींनी मोहीम हाती घेतली आहे. एबीपी माझानेही हा प्रश्न उचलून धरला होता. याची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही घेतली आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. त्याचबरोबर सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.
आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधीत वटवृक्ष पुरातन असून त्याचे जतन होणे गरजेचे आहे.























