एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : पैलवान राहुल आवारेला उद्धव ठाकरेंकडून 11 लाखांचं बक्षीस
मुंबई : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पैलवान राहुल आवारे याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘मातोश्री’वर राहुल आवारेच्या सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून राहुल आवारेला 11 लाख रुपयांची मदत दिली. उद्धव ठाकरेंच्या हस्तेच आर्थिक मदतीचा धनादेश राहुलला सुपूर्द करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते लीलाधर डाके, आमदार तानाजी सावंत, विश्वनाथ नेरुरकर, संजय नटे, सुरेश कांबळे इत्यादी उपस्थित होते.
29 तारखेला शरद पवार यांच्या वतीने राहुल आवारेचा सत्कार झाला. त्यावेळी राहुलला पवारांकडून 12 लाखांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. याच कार्यक्रमात राज्याचे समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे हे उपस्थित होते. दिलीप कांबळेंनी या कार्यक्रमात सांगितले की, “राहुल आवारे याला शासकीय सेवेत घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्की केले आहे.” त्यामुळे राहुल आवारे डीवायएसपी होणार हे निश्चित झाले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुल आवारेनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती.

महाराष्ट्र
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP Majha
Amol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेल
Kisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement