एक्स्प्लोर

Exclusive Interview : सफाई कामगाराचा मुलगा ते National Award... Kastoori सिनेमाच्या टीमशी खास संवाद

चित्रपट प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली.  या पुरस्कारांचे वितरण नुकतेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायुडू, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याहस्ते झाले. यावेळी रजनीकांत यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या पुरस्कारांमध्ये काही मराठी चित्रपटांना विविध विभागात पुरस्कार मिळाले. या पुरस्कारात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतल्या पोरांनी हवा केली. बार्शीतला तरुण दिग्दर्शक विनोद कांबळेच्या 'कस्तुरी'ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. विनोदनं हा पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला. बार्शीतला अभिनेता विठ्ठल काळेंच्या काजरोला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याआधी बार्शीतील अमर देवकर यांच्या म्होरक्या या चित्रपटाला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.  विनोद कांबळे आणि कस्तुरीच्या टीमसोबत एबीपी माझा डिजिटलनं खास संवाद साधला... 

विनोदच्या 'कस्तुरी'चा दरवळ

इंजिनियरिंग सोडून आवड जपण्यासाठी चित्रपट क्षेत्राकडे वळलेल्या विनोद कांबळेनं पुन्हा एकदा बार्शीचं नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवलं आहे. विनोद कांबळे लिखित आणि दिग्दर्शित कस्तुरी या सिनेमाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विनोदनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. पोस्टमार्टम करणाऱ्या एका लहान मुलाच्या स्वप्नाची गोष्ट असलेल्या कस्तुरीचा दरवळ आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. याआधीही कस्तुरी सिनेमानं देशासह जगभरातील काही महत्वाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आता त्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर लागली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व स्थानिक कलाकार आहेत.

संघर्षातून पुढे येत पुरस्कारावर कोरलं नाव

विनोद कांबळेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुरस्कारापर्यंत प्रवास केलाय. विनोद कांबळेची घरची परिस्थिती बेताची. विनोदचे वडील आजही बार्शी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यात इंजिनियरिंग सोडून त्याने चित्रपटाची आवड असल्याने मार्ग अवलंबला. विनोदनं याआधीही केलेल्या पोस्टमार्टम या लघुचित्रपटाला देखील अनेक पुरस्कार मिळाले होते. विनोदने म्होरक्या या गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमासाठी देखील सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. 

करमणूक व्हिडीओ

Vicky Kaushal Marathi Bhasha Din Poem | मराठी भाषा निमित्ताने विकी कौशल यांने सादर केली 'कणा' कविता
Vicky Kaushal Marathi Bhasha Din Poem | मराठी भाषा निमित्ताने विकी कौशल यांने सादर केली 'कणा' कविता

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KK Wagan Pakistan ambassador to Turkmenistan : पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
Sanjay Raut on Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
Champions Trophy टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर, रोहित शर्माला स्थान नाही
Champions Trophy टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर, रोहित शर्माला स्थान नाही
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Contract Cleaner Mahapalika : 580 कंत्राटी सफाई कामगार मुंबई महापालिकेत कायम9 Sec Superfast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 : ABP MajhaOrange growers Vidarbha : बी आणि सी ग्रेड संत्र्यालाही मिळतोय प्रतिकिलो 22 रुपयांचा दरBeed Crime News : प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाकडून दुकान चालकाला मारहाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KK Wagan Pakistan ambassador to Turkmenistan : पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेईज्जती सुरुच! अमेरिकेत पोहोचलेल्या राजदूतांना विमानतळावरूनच घरी पाठवलं
Sanjay Raut on Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
रवींद्र धंगेकर बायकोमुळे काँग्रेस सोडून शिंदे गटात का गेले? संजय राऊतांचा सनसनाटी दावा
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
भाजप नेत्याच्या थेट पोटात विषारी इंजेक्शन टोचून निर्घृण हत्या; माजी मुख्यमंत्र्यांविरोधात लढवली होती निवडणूक, पत्नी तिसऱ्यांदा सरपंच
Champions Trophy टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर, रोहित शर्माला स्थान नाही
Champions Trophy टीम ऑफ टूर्नामेंट जाहीर, रोहित शर्माला स्थान नाही
Elon Musk on X Cyber Attack: X वरील सायबर हल्ल्यामागे युक्रेन! इलॉन मस्क यांनी दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण; म्हणाले, तिथला IP Address 
X वरील सायबर हल्ल्यामागे युक्रेन! इलॉन मस्क यांनी दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण; म्हणाले, तिथला IP Address 
Porsche Car Accident : पुण्यानंतर आता आणखी एक पोर्शे कारचा थरकाप; भरधाव धडकेत ॲक्टिव्हा चालकाच्या शरीराचे दोन तुकडे, दोन तरुणींना सुद्धा उडवलं
पुण्यानंतर आता आणखी एक पोर्शे कारचा थरकाप; भरधाव धडकेत ॲक्टिव्हा चालकाच्या शरीराचे दोन तुकडे, दोन तरुणींना सुद्धा उडवलं
आजचा मंगळवार 4 राशींसाठी भाग्यशाली!
आजचा मंगळवार 4 राशींसाठी भाग्यशाली!
Beed Crime Satish Bhosale: लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? खोक्या भाईचं 'बाणेदार' उत्तर
लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? खोक्या भाईचं 'बाणेदार' उत्तर
Embed widget