Sharad Ponkshe : पप्पा म्हणाले हिंदुत्त्ववादी सरकार हवं, लेक म्हणाला मलापण मोदीच हवेत
Sharad Ponkshe : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी मुंबईत आज मतदानाचा हक्क (Lok Sabha Election 2024) बजावला आहे. शरद पोंक्षे पत्नी आणि मुलासह मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोदी (PM Narendra Modi) यावे, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार यावं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीचं सरकार यावं, असंही ते म्हणाले. शरद पोंक्षेंनी हिंदुत्ववादी सरकार असण्याचे फायदे सांगितले. पोंक्षे पितापुत्रांनी आपलं थेट मांडलं.
शरद पोंक्षे मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया देत म्हणाले,"देशासाठी थोडा त्रास सहन करायला हरकत नाही. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. पुन्हा एकदा मोदी यावेत आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार यावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचं सरकार यावं. याचं एकमेव कारण म्हणजे जोपर्यंत हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे तोपर्यंत सर्वधर्मीय सुखाने राहणार".