Mithun Chakraborty : मिथून चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक, कोलकात्याच्या अपोलो रूग्णालयात दाखल
मुंबई : अभिनेते आणि राजकारणी मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या प्रकृतीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मिथून चक्रवर्ती यांना कोलकाता (Kolkata) येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथून यांना छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांची सध्या प्रकृती स्थिर असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. मिथून यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.
मिथून यांचं सध्या वय हे 73 वर्ष आहे. शनिवार 10 फेब्रुवारी रोजी मिथून यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी अचानक त्यांना छातीत दुखणं सुरु झालं. आणखी कोणता त्रास होण्याआधी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पण त्यांच्या तब्येतीबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आली नाहीये.