एक्स्प्लोर
Birju Maharaj : पद्मविभूषण कथ्थक गुरु बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन : ABP Majha
एक दुःखद बातमी...प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि गुरू पंडित बिरजू महाराज यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित झालेले पंडित बिरजू महाराज कथक नर्तक होतेच, याशिवाय ते शास्त्रीय गायकही होते. नर्तक घराण्याचा वारसा लाभलेल्या पंडित बिरजू महाराज यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून नृत्य शिकवण्यास सुरुवात केली होती. अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शनही त्यांनी केलं. त्यांच्या निधनानं नृत्यूगुरू हरपल्याची भावना व्यक्त केली जातेय..
आणखी पाहा























