एक्स्प्लोर
Akshay Kumar Nashik tour | अक्षय कुमारचा नाशिक दौरा वादग्रस्त, मंत्री छगन भुजबळांकडून चौकशीचे आदेश
अभिनेता अक्षयकुमारला नुकताच केलेला नाशिक दौरा महागात पडण्याची शक्यता आहे. एका खाजगी दौऱ्यांतर्गत अक्षयकुमार नाशिकला हेलिकॉप्टरने गेला होता. त्याने एक दिवस मुक्काम केल्याची देखील माहिती आहे. मात्र अक्षयकुमारच्या या दौऱ्याची आता चौकशी होणार आहे.
मंत्री छगन भुजबळांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला हेलिपॅडसाठी परवानगी कोणी दिली? हॉटेल्स बंद असताना अक्षयसाठी रिसोर्ट उघडे कसे झाले? मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असताना, अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. शहरात पोलिसांचा हद्दीचा वाद सुरू असताना ग्रामीण भागात शहर पोलिसांचे एसकोर्ट कसे ? असा सवाल देखील पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

आणखी पाहा