Akshay Kumar आणि Vaani Kapoor झोपाळ्यातून पडले, Bell Bottom चित्रपटाच्या सेटवरील घटना
चित्रपटाच्या शूटिंगचे किस्से सांगायचे ठरवलं ना, तर कदाचित त्या किश्श्यांच्या कार्यक्रमांची मालिका करावी लागेल. कारण शूटिंगच्या दरम्यान अनेकदा गमतीजमती घडत असतात. कधी कलाकार पडतात...धडपडतात, कधी त्यांना मार लागतो. पण त्याही परिस्थितीत त्यांना निर्मात्याचं नुकसान टाळण्यासाठी शूटिंग सुरु ठेवावं लागतं. आता हेच बघाना, अक्षयकुमारचं काय झालं? एका चित्रपटातल्या प्रणयदृश्याचं शूटिंग करताना अक्षय पडला. त्यामुळं प्रेमातही कसं पडायला होतं, त्याचं विनोदी उदाहरण स्वतः अक्षयनंच त्याच्या चाहत्यांसमोर ठेवलंय. अक्षयचा नवा चित्रपट बेलबॉटम लवकरच रिलीज होणाराय. या चित्रपटातलं 'मरजावां' हे गाणं नुकतंच रिलीज झालं. अक्षयनं त्या गाण्याचा बिहाईंड द सीन व्हीडिओ रिलीज केलाय.























