NMMC Election | नवी मुंबईत मनसे स्वबळावर लढणार, अमित ठाकरे, आमदार राजू पाटलांच्या हस्ते उद्घाटन
राज ठाकरे यांची सिक्युरिटी काढून घेणे हे सरकारचे घाणेरडे राजकारण चालू आहे. राज ठाकरेंना कुठल्याही सिक्युरिटीची गरज नाही आहे. राज यांच्या सुरक्षेसाठी मनसैनिक खभीर आहेत. असे वक्तव्य मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी केले. मनसे नेते अमित ठाकरे आणि आमदार राजू पाटील यांच्या हस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन झाले.. यावेळी राजू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली. गेल्या काही वर्षांपापासून सत्तेत आलेलं सरकार विरोधकांचे नगरसेवक पळवत आलेत हा ट्रेंड आलाय, जो सत्तेत असतो तो त्याचा गैरवापर करत असतो. राजकारणाचा हा पॅटर्न बदलण्यासाठी लोकांनी पुढे आले येवून जे बेडूक उड्या मारतात त्यांना घरी बसवलं पाहिजे. नवी मुंबई महापालिकेत भाजपा सोबत युती चा प्रस्ताव अद्याप आला नाही. युती संदर्भातील निर्णय राज ठाकरे घेतील. मात्र मनसेने सर्व जागा लढण्याची तयारी केली असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले .