Maharashtra Schools Reopen : नाताळच्या सुट्ट्यांनंतरच शाळा सुरु करा, पालकांची मागणी ABP Majha
ग्रामीण भागात पहिलीपासून शाळा सुरु झाली असली तरी महत्वाच्या शहरांमधील पहिलीपासूनचे वर्ग अजूनही बंद आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन उद्या किंवा १५ तारखेऐवजी शाळा नवीन वर्षातच सुरु करा, अशी मागणी शिक्षक-पालकांकडून केली जातेय. मुंबई, पुण्यासारख्या शहरात १५ डिसेंबरपासून तर नाशिक, औरंगाबादेत उद्यापासून पहिली ते पाचवीच्या मुलांची शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. पण त्याविषयी अजूनही निर्णय झालेला नाही. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून म्हणजे २३ डिसेंबर ते १ जानेवारी अशी नाताळची सुट्टी असते. त्यामुळे १५ तारखेला शाळा सुरु केल्यास आठवडाभरानंतर नाताळची सुट्टी लागेल. त्यामुळे नवीन वर्षातच शाळा सुरु करण्याची मागणी शिक्षक आणि पालकांनी केलीए.


















