CBSE Board Exams 2021 | CBSE परीक्षांसंदर्भात पंतप्रधानांची दुपारी शिक्षणमंत्री, अधिकाऱ्यांसोबत बैठक
नवी दिल्ली : CBSE बोर्ड परीक्षांसंदर्भात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करावी अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केली आहे. राजधानी दिल्लीला कोरोनाचा हॉटस्पॉट बनवण्यापासून वाचवायचं असेल तर या परीक्षा रद्द कराव्या, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. लाखो विद्यार्थी आणि सुमारे एक लाख शिक्षक परीक्षेच्या प्रक्रियेत सहभागी होणं म्हणजे राजधानी दिल्ली कोरोनाचा हॉटस्पॉट बनेल आणि त्यानंतर परिस्थिती हाताळणं कठीण होईल.
![Sudhir Mugntiwar Satara Speech : छत्रपती शिवाजी महाराज की जय! म्हणत सुधीर मुनगंटीवराचं जोरदार भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/19/b0631ef91b500cf5ec9947f401caf75e1721392167176977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Pune Accident : पुण्यात मर्सिडीज गाडीखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; पोर्शे प्रकरण ताजं असताना पुण्यात अणखी एक अपघात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/c10854bb2e787e10a3e2070884606b5017187207060301000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![NEET UG Exam Result 2024 : नीट परिक्षेच्या निकालात गोंधळ, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/463eed10cc89185c1d91f2d9137241391718217650040540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra School Shloka: अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता; राज्य शालेय शिक्षणाचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/24/47b9ae0f8537f04e57cc19c36649eba41716530835647977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![HSC Result 2024 Update : बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींची बाजी ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/21/4e6e9894d19c4efc48da1ff0de5a257a1716272342165977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)