एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी दिल्ली : अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा चौथा दिवस, अण्णांचे सहकारी सुरेश पठारेंशी बातचीत
जनलोकपाल आणि शेतमालाला दीडपट भाव यासह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर सलग चार दिवसांपासून अण्णा हजारेंचं आंदोलन सुरु आहे. यामुळे अण्णा हजारेंचं वजन 3 किलोनं घटलं आहे. तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज केंद्र सरकारचं शिष्टमंडळ अण्णा हजारेंना भेटणार आहे. यात महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश असणार आहे. महाजन यांनी कालच अण्णांना भेटीची वेळ मागितली, परंतु लेखी आश्वासन दिल्याशिवाय भेटू नका, असं सांगत अण्णांनी ती नाकारली. त्यामुळे आज आवश्यक दस्तावेज घेऊन सकाळी ११ वाजता महाजन रामलीला मैदानावर अण्णांना भेटणार आहेत. 2011 च्या जनलोकपाल वेळी दिल्लीत अण्णांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला पण यंदा म्हणावी तशी गर्दी जमली नाही. या सर्वांवरच अण्णांचे सहकारी सुरेश पठारेंशी एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी संवाद साधला.
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement