Cricket : धक्कादायक! विराट कोहलीच्या चाहत्यानं रोहित शर्माच्या चाहत्याला संपवलं, काय आहे प्रकरण?
भारतात क्रिकेट जणू विराटच्या चाहत्याने रोहितच्या चाहत्याची डोक्यात बॅट मारुन हत्या केलीय.. तामिळनाडूच्या अरियालूर भागात ही धक्कादायक घटना घडलीय.. रोहित शर्माचा चाहता विग्नेश आणि विराटचा चाहता धर्मराज मल्लूर क्रिकेटबाबत चर्चा करत होते. दोघांनीही मद्यसेवन केलं होतं अशी माहिती मिळतेय.. विग्नेश हा रोहितच्या मुंबई इंडियन्स संघाचं तर धर्मराज हा आरसीबीचं समर्थन करत होता. यावेळी दोघांमध्ये वाद झाला.. विग्नेशनं आरसीबी संघाची टिंगलटवाळी केल्याच्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी पोलिसांनी धर्मराजला अटक केलीय.. मात्र या घटनेचे सोशल मीडियावरही पडसाद उमटतायत.. ट्विटरवर अरेस्ट कोहली हॅशटॅग ट्रेंड होतोय...























