मनसुख हिरण यांची हत्या झाल्याच्या रात्रीचा सचिन वाझेंचा EXCLUSIVE व्हिडीओ, पुरावा म्हणून वापरण्याचा होता प्लॅन
ठाणे : मनसुख हिरण हत्या प्रकरण एनआयएकडे देण्याचे निर्देश ठाणे सत्र न्यायालयाने दिल्यानंतर एनआयए अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहे. गुरूवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास सचिन वाझेंना ठाण्यातील रेती बंदर परिसरात मनसुख हिरण प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी आणण्यात आलं.
मनसुख हिरण हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी एनआयचे पथक वाझेंना घेऊन रेती बंदर परिसरातील विसर्जन स्थळावर दाखल झाले. यावेळी त्यांनी वाझेंसोबत येथे 10 मिनिटे पाहणी करत वाझेंची चौकशी केली. याच विसर्जन स्थळावर व्यावसायिक मनसुख हिरण याचं शव टाकण्यात आल्याचा संशय एनआयएला होता. त्याप्रमाणे एनआयएची टीम वाझेंना पाहणीसाठी आणि घटनेचं रिक्रिएशन करण्यासाठी रेती बंदर परिसरात दाखल झाली होती.























