Pimpri Chinchwad : रात्रभर टीव्ही सुरू ठेवला म्हणून पत्नीची हत्या, पत्नीचा गळा घोटून हत्या, जागीच मृत्यू
Pimpri Chinchwad : रात्रभर टीव्ही सुरू ठेऊन का झोपलीस? या कारणावरून पतीने पत्नीचा गळा घोटला. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पुण्याच्या मावळ तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या पोटी मुलगी जन्मल्याची देखील या घटनेला किनार आहे. चांदखेड येथील चांगुणा जाधव असं मृत महिलेचं तर आरोपी पतीचे योगेश जाधव असं नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच या दाम्पत्याने मुलीला जन्म दिला. पण मुलगी जन्मली म्हणून योगेश पत्नीचा नेहमीच छळ करत होता. अशात रात्रभर टीव्ही सुरूच राहिल्याचं कारण योगेशला मिळालं आणि त्याने तिचा गळा घोटून जीव घेतला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.























