एक्स्प्लोर
Crime | नंदुरबारमध्ये अफूची शेती, साडेसात एकरवर अफूची लागवड; दोघांना अटक
नंदुरबारमधील अतिदुर्गम भागात धाड टाकून पोलिसांनी साडेसात एकरवर लावलेला अफू जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशितांना अटक केली आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अफूची लागवड केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधीक्षक श्रीकांत घुमरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांना सापळा रचून ही कारवाई केली आहे. अतिदुर्गम भागात मक्याच्या पिकाच्या आड अफूची लागवड केली जात असल्याचं यावेळी समोर आलं. दरम्यान साडेसात एकर एवढ्या मोठ्या प्रमाणाच्या अफूची लागवड केली जात असल्यानं पोलिसही आवाक झाले.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















