एक्स्प्लोर

दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार

ॲक्वा लाईनवरील प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेऊन एमएमआरसीने मेट्रो सेवांची वारंवारता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबई मेट्रोच्या (Metro) ॲक्वा लाईनवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई (Mumbai) मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मेट्रो मार्गिका ३ वरील फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सोमवार, २ नोव्हेंबरपासून कामकाजाच्या दिवशी ४६ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मेट्रोच्या दैनंदिन फेऱ्यांची संख्या २९१ वरून ३३७ झाली आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मेट्रोसाठी कमी प्रतीक्षा करावी लागणार असून, गर्दीचे व्यवस्थापन करणेही अधिक सोपे होणार आहे.

ॲक्वा लाईनवरील प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेऊन एमएमआरसीने मेट्रो सेवांची वारंवारता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर ४ मिनिटे ५० सेकंदांवरून ४ मिनिटे २५ सेकंदांपर्यंत कमी करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी वेळेत मेट्रो उपलब्ध होणार असून, स्थानकांवरील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल.

आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर दैनंदिन फेऱ्यांची संख्या २७१ करण्यात आली होती. त्यानंतर प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानुसार २३ जून २०२६ रोजी फेऱ्यांची संख्या २८२, तर २८ सप्टेंबर २०२६ रोजी २९१ करण्यात आली. आता आणखी ४६ फेऱ्यांची भर पडल्याने कामकाजाच्या दिवशी ही संख्या ३३७ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांना अधिक वारंवार आणि सोयीस्कर मेट्रो सेवा उपलब्ध होणार आहे.

गर्दीच्या वेळेत प्रतीक्षा कालावधी कमी होणार

नवीन वेळापत्रकानुसार गर्दीच्या वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर ४ मिनिटे २५ सेकंद करण्यात आले आहे. यापूर्वी हे अंतर ४ मिनिटे ५० सेकंद होते. मेट्रो गाड्यांची वारंवारता वाढल्यामुळे प्रवाशांना स्थानकांवर अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. तसेच गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. शनिवार आणि रविवारच्या दिवशी मात्र मेट्रो सेवा स्वतंत्र सप्ताहअखेरच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.

प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सेवांमध्ये वाढ

मुंबईकरांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एमएमआरसीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांच्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत आहे. भविष्यातही प्रवासीसंख्या आणि सेवेची आवश्यकता लक्षात घेऊन मेट्रो फेऱ्यांच्या वेळापत्रकात आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.

हेही वाचा

राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
दात घासता घासता टूथब्रशच गिळला; अथक प्रयत्नानंतर शस्त्रक्रियेविनाच डॉक्टरांनी पोटातून काढला बाहेर
दात घासता घासता टूथब्रशच गिळला; अथक प्रयत्नानंतर शस्त्रक्रियेविनाच डॉक्टरांनी पोटातून काढला बाहेर
भुजबळ, मुश्रीफ सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजित दादांना त्रास दिला, हे दादांनीच मला सांगितलं; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
भुजबळ, मुश्रीफ सोडले तर बाकीच्या नेत्यांनी अजित दादांना त्रास दिला, हे दादांनीच मला सांगितलं; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
Advertisement

व्हिडीओ

Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
Embed widget