एक्स्प्लोर
Manish Sisodia : दिल्लीच्या वादग्रस्त मद्य धोरणाप्रकरणी मनीष सिसोदियांच्या बॅंक लॉकरची झडती
दिल्लीच्या वादग्रस्त मद्य धोरणाप्रकरणी सीबीआयने मंगळवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या लॉकरची झडती घेतली. गाझियाबादच्या वसुंधरा सेक्टर 4 च्या पंजाब नॅश्नल बँकेत सिसोदियांचे लॉकर आहे. कारवाई सुरु असताना कुणालाही आत किंवा बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. खातेधारकाच्या परवानगी व उपस्थितीशिवाय लॉकर खोलता येत नाही. त्यामुळे मनीष सिसोदिया व त्यांच्या पत्नी सीमा यांना तिथे बोलावण्यात आले होते. तपासानंतर सीबीआयला लॉकरमध्ये काहीच आढळले नाही. माझे कुटुंब निर्दोष आढळले आहे. मला तुरुंगात पाठवण्याची तयारी होत आहे. असा आरोप सिसोदियांनी केला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























