Aftab Poonawalla : वसई पोलिसांच्या फोननंतर आफताबने पुरावे मिटवले? दिल्ली पोलिसांचा दावा
वसई पोलिसांच्या या फोन कॉलनंतर आफताब अधिक सतर्क झाला आणि त्याने पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केली असं सांगण्यात येतंय.. कारण आफताबने 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्याने श्रद्धाचा मोबाईल भाईंदरच्या खाडीत फेकून दिला होता दरम्यान जर श्रद्धाचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असता तर अनेक गोष्टींचा उलगडा झाला असता. आता पोलिसांकडून श्रद्धाचे व्हाट्सअॅप अकाउंट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय... पोलिसांकडून तांत्रिक पुरावे जमा करण्यात येत असून 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान श्रद्धाचा फोन अॅक्टिव्ह होता आशी माहिती मिळतेय. दरम्यान याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांचीही चौकशी करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाहांनी दिले होते..























