Cryptocurrency :आर्थिक जगतात केट कॉईनचा बोलबाला, 1हजाराची गुंतवणूक करणाऱ्यांना दरमहा 28हजाराचा फायदा
सध्या अर्थजगतात क्रिप्टोकरन्सीचा बोलबाला आहे. अशातच बाजारात नव्यानं आलेल्या केट कॉईननं गुंतवणूकदारांना रातोरात श्रीमंत केलंय..या क्रिप्टोकरन्सीमध्ये १ हजार गुंतवणाऱ्यांना महिनाभरात २८ हजार १८० रुपयांचा फायदा झाला आहे..१० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरदरम्यान केट कॉईनमध्ये ही तेजी पाहायला मिळाली आहे. याच वर्षात हा कॉईन बाजारात लाँच झाला होता..सध्या हा क्वॉईन फक्त झेडटी.. गेट डॉट आयओ.. पॅनकेक स्वॅप, BKEX आणि ZB.COM या एक्सचेंजवर लिस्ट झाला आहे. 2021 या वर्षात शिभा इनू आणि डोजे कॉईन या दोन क्वॉईनने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. दरम्यान क्रिप्टोकरन्सीमधल्या गुंतवणुकीवर अर्थतज्ज्ञांकडून वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात. त्यामुळं गुंतवणूकदारांनी स्वतःच्या जोखमीवर गुतंवणूक करावी.
दरम्यान क्रिप्टोकरन्सीसंदर्भात धोरण ठरवण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरु केल्यात...























