एक्स्प्लोर
Union Budget 2024 LIVE: अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं बजेट मांडणार आहेत. यावर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्यामुळे हे अंतरिम बजेट असेल. त्यांच्या कारकिर्दीतलं हे सहावं बजेट असेल. मोरारजी देसाईंच्या विक्रमाशी त्या बरोबरी करतील. सकाळी ११ वाजता अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करतील. आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्पीय वाटप आणि महसुली अपेक्षांची रूपरेषा त्या आज मांडतील. लोकसभेत बजेट मांडून झाल्यावर राज्यसभेत बजेट मांडलं जाईल. बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण आपण एबीपी माझावर पाहू शकाल.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























