Union Budget 2024 : सर्व प्रकारचे स्मार्टफोन स्वस्त होण्याची शक्यता
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं बजेट मांडणार आहेत. यावर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्यामुळे हे अंतरिम बजेट असेल. त्यांच्या कारकिर्दीतलं हे सहावं बजेट असेल. मोरारजी देसाईंच्या विक्रमाशी त्या बरोबरी करतील. सकाळी ११ वाजता अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करतील. आर्थिक वर्ष 2024-25 साठी अर्थसंकल्पीय वाटप आणि महसुली अपेक्षांची रूपरेषा त्या आज मांडतील. लोकसभेत बजेट मांडून झाल्यावर राज्यसभेत बजेट मांडलं जाईल. बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण आपण एबीपी माझावर पाहू शकाल. बजेटच्या एक दिवस आधी सरकारने दिली आनंदाची बातमी... सर्व प्रकारचे स्मार्टफोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सरकारने सर्वसामान्यांना फायदेशीर ठरू शकेल अशी एक आनंदाची बातमी दिली आहे. मोदी सरकारने अर्थसंकल्पापूर्वी काल मोबाईल पार्ट्सवरील आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आणि आता मोबाईल पार्ट्सवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून १०% करण्यात आला आहे.