Union Budget 2023 : जगात मंदीचं सावट, भारताची पावलं कशी?, महागाईतून कसा दिलासा मिळणार? : ABP Majha
केंद्राचा अर्थसंकल्प आज जाहीर होणारेय, मोदी सरकारच्या काळातील हा नववा अर्थसंकल्प असून संपूर्ण देशाचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. कोणत्या घटकाला दिलासा मिळणार आणि कुणावर कराचा बोजा लादला जाणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे, सकाळी अकरा वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प मांडतील,. पायाभूत सुविधांना अधिक निधी उपलब्ध करून देण्यावर आणि इमारती आणि रुग्णालयांसाठी खासगी भागीदारी वाढविण्यासाठी तसेच रुग्णालयातील कामकाजाची क्षमता वाढवण्याची शक्यता अर्थ वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. तसेच या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार, कृषी क्षेत्रासाठी दिलाशाची पेरणी होणार का?, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. त्याचबरोबर जगातील अनेक देश हे मंदीच्या उंबरठ्यावर आहे, त्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती ही बरीच चांगली आहे... जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे... त्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात काय-काय असणार आहे. याकडे सर्वसामान्यांसह गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय...